17 November 2019

News Flash

कोर्टाच्या चेंबरमध्ये महिला वकिलावर बलात्कार, वरिष्ठ वकिलाला अटक

एका ३२ वर्षीय महिला वकिलाने आपल्या वरिष्ठावर बलात्काराचा आरोप केला आहे. शनिवारी रात्री एका खटल्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने वरिष्ठ वकिलाने मला त्याच्या कोर्टातील चेंबरमध्ये बोलवले.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दिल्लीतील साकेत कोर्टातील एका ३२ वर्षीय महिला वकिलाने आपल्या वरिष्ठावर बलात्काराचा आरोप केला आहे. शनिवारी रात्री एका खटल्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने वरिष्ठ वकिलाने मला त्याच्या कोर्टातील चेंबरमध्ये बोलवले व माझ्यावर बलात्कार केला असा आरोप महिला वकिलाने केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करुन आरोपी वकिलाला अटक केली आहे तसेच पीडित महिलेची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीसीपी रोमिल बानिया यांनी दिली.

आरोपी वकिलाचे वय ५० वर्ष आहे. मी माझ्या चेंबरमध्ये काम करत असताना वरिष्ठ वकिलाने मला एका प्रकरणावर चर्चा करायची असल्याचे सांगून त्याच्या चेंबरमध्ये बोलावले. मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आरोपी मद्याच्या अंमलाखाली होता. त्याने केसवर चर्चा करण्याऐवजी मला ड्रींक ऑफर केली. मी नकार दिल्यानंतर आरोपीने अश्लील बोलण्यास सुरुवात केली व माझ्यावर लैंगिक जबरदस्ती केली असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेला कुठे वाच्यात केलीस तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. आरोपी वकिल तिथून निघून गेल्यानंतर महिलेने पोलिसांना बोलावले. त्यानंतर महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. पोलिसांनी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यासाठी पथक पाठवले. दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे पथक नंतर त्या वकिलाच्या चेंबरमध्ये गेले होते. फॉरेन्सिक तपासणीसाठी ते चेंबर बंद करण्यात आले आहे. घटनाक्रम जुळवण्यासाठी पोलीस चेंबरमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

First Published on July 16, 2018 2:32 pm

Web Title: woman lawyer alleges rape by senior in court chamber