News Flash

महिलेने जावयावर केला बलात्काराचा आरोप

पीडित महिलेबरोबर महिन्याभरापूर्वी बलात्काराची घटना घडली होती.

(सांकेतिक छायाचित्र)

महिलेने जावयाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. पीडित महिलेबरोबर महिन्याभरापूर्वी बलात्काराची घटना घडली होती. पीडित महिलेने शुक्रवारी संध्याकाळी हैदराबादच्या पंजागुट्टा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. आरोपी एका खासगी कंपनीत चांगल्या हुद्दयावर नोकरीला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित महिलेने तिच्याबरोबर नेमके काय घडले ते सर्व तक्रारीत नमूद केले आहे. १३ नोव्हेंबरला झोपेमध्ये असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली. “मी झोपेमध्ये असताना आरोपी माझ्या खोलीमध्ये आला व त्याने लैंगिक जबरदस्ती केली. मी आरडाओरडा करुन इतरांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझे तोंड बंद करुन माझ्यावर बलात्कार केला” असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

“गुन्हा घडल्यानंतर महिन्याभराने महिलेने तक्रार नोंदवली. आम्ही तात्काळ तक्रार नोंदवून घेतली. आम्ही सर्व बाजूंनी या गुन्ह्याचा तपास करत आहोत सध्या आरोपी फारर आहे” असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने सांगितले. “गुन्हा घडला त्यादिवशी रात्री मी झोपेच्या गोळया घेऊन झोपी गेले. माझी मुलगी कामावर गेली होती. आरोपी दुसऱ्या खोलीत दारु पीत बसला होता” असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

मुलगी घरी आली तेव्हा तिला आई रडत असल्याचे दिसले. तिचा नवरा घरामध्ये नव्हता. महिलेने तिच्या मुलीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने लगेच तिच्या नवऱ्याला घरी बोलावून घेतले व जाब विचारला. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देत तो घरातून निघून गेला. मी लवकरच तुला घटस्फोट देऊन पोटगी देईन असे त्यावेळी आरोपीने म्हटले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:37 pm

Web Title: woman lodges rape complaint against son in law dmp 82
Next Stories
1 “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे; मी माफी मागणार नाही”
2 देशहितासाठी भाजपा तडजोड करण्यासही तयार : आशिष शेलार
3 देशाची अवस्था बिकट; ‘मोदी है तो मुमकीन है’च्या जाहीराती फसव्या – प्रियंका गांधी
Just Now!
X