01 October 2020

News Flash

आठ महिन्यांमध्ये ‘तिनं’ केली ६ लग्न; प्रत्येक लग्नाचे मिळायचे पैसे आणि…

पाहा पुढे काय झालं...

लग्नाच्या दोन दिवसांनंतर नववधूनं आपल्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या इच्छेप्रमाणे तिला सोडण्यासाठी तिचा पतीही सोबत निघाला. पण झालं असं की काही चुकीचं होत असल्याची कुणकुण त्या व्यक्तीला लागली. परंतु तोवर त्याची हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्यामधील त्या पतीचं मृत शरीर सापडलं. काही दिवसांपूर्वी रतलाम जिल्ह्यातील सेलानानजीक एका युवकाचं मृत शरीर मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात तपास करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती समजली. सदर महिला ही साधीसुधी नसून तिनं यापूर्वी अनेक युवकांना लुटल्याची माहिती समोर आली. यापूर्वी तिनं राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही काही जणांसोबत लग्न करून त्यांना लुटलं होतं.

तरूणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात त्याच्या पत्नीनंच त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु ती आपल्या टोळीसोबत फरार झाली होती. त्या दोघांचं लग्न एका लग्न जुळवणाऱ्या संस्थेमार्फत जमलं होतं. तसंच लग्नासाठी त्या महिलेल्या खोट्या भावानं अडीच लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मान्यतेनं लग्न लावून देण्यात आलं.

लग्नाच्या दोनच दिवसांनंतर त्या महिलेचे कुटुंबीय म्हणून आलेल्या चार जणांनी त्यांना आपल्यासोबत गाडीतून नेलं आणि दुसऱ्या दिवशी त्या तरूणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आपल्या सूत्रांच्या मदतीनं आणि सायबर सेलद्वारे या घटनेचा तपास केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या मोबाईल लोकेशनद्वारे ते कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी पोहोचून महिलेला अटक केली.

आपल्या पहिल्या पतीला सोडल्यानंतर तीन वर्षांपासून ती आपल्या आईवडिलांबरोबर राहत असल्याचं तिनं चौकशीदरम्यान सांगितलं. परंतु त्यादरम्यान कुटुंबीयांशी तिचं भांडण झालं आणि तिनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी असलेल्या एका व्यक्तीशी तिची भेट झाली. तोच लग्नासाठी लुटताना तिच्यासोबत तिचा भाऊ म्हणून भेटला होता. तिला एका लग्नासाठई १० हजार रूपयांची रक्कम मिळत होती असंही तिनं पोलिसांना सांगितलं. आतापर्यंत तिनं राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही जणांना खोटं लग्न करून लुटलं असल्याचंही समोर आलं. तिनं गेल्या ८ महिन्यांमध्ये तब्बल ६ लग्न केली असल्याचीगही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तरूणाच्या मृत्यूच्या तपासातही एक धक्कादायक बाब समोर आली. त्याव्यक्तीला लुटल्यानंत संबंधित आरोपींनी त्याला चालत्या गाडीतून बाहेर फेकलं. परंतु आपल्यासोबत असा कट रचला असल्यानं निराश झालेल्या तरूणानं झाडाला शर्टानं गळफास लावून आत्महत्या केली. सध्या त्या तरूणीला अटक करण्यात आली असून लग्न जमवण्यासाठी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 3:27 pm

Web Title: woman married with 6 people she was getting money after every marriage crime story jud 87
Next Stories
1 केरळ विमान अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख, जखमींना दोन लाखांची मदत
2 ‘बीएसएफ’कडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
3 चीनसोबत एखादा पक्ष कसा करार करू शकतो?; न्यायालयाचा काँग्रेसला सवाल
Just Now!
X