16 January 2021

News Flash

‘दादा असं करु नका’, तरुणी गयावया करत असताना आरोपी काढत होते छेड

काही तरुण एका महिलेची छेड काढत तिला जंगलात फरफटत नेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुण एका महिलेची छेड काढत तिला जंगलात फरफटत नेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तीन तरुण महिलेला खेचत जंगलात नेत असल्याचं दिसत आहे. यावेळी महिला आपल्या सोडून देण्याची विनवणी करत असल्याचं ऐकू येत आहे. महिला आरोपींना गयावया करत ‘दादा असं करु नका’ म्हणत आहे. मात्र तरीही आरोपींना तिच्यावर दया येत नाही. आरोपींनी महिलेचे केस पकडलेले असून तिला शिव्या घालत आहे.

झटापट सुरु असताना एक आरोपी बोलताना ऐकू येत आहे की, ‘आता आमची चप्पल निघेल’. यावेली महिला हात जोडून आरोपींना विनंती करत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गंगघाट पोलिसांनी स्वत: दखल घेत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

अद्याप पीडित महिलेची ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेचं तिच्या घरातून अपहरण केलं होतं. जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. उन्नाव पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 2:55 pm

Web Title: woman molest unnao video viral up
Next Stories
1 झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही, मलेशिया सरकारची आडमुठी भूमिका
2 ‘संजू’मध्ये न दाखवण्यात आलेल्या सत्याचं काय? – उज्ज्वल निकम
3 कारसमोर कचऱ्याचा ढीग आल्याने संतापले अमित शहा
Just Now!
X