News Flash

धक्कादायक! लिफ्ट दिल्यानंतर कारमध्ये महिलेवर बलात्कार

महिलेने कारमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. आरोपीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला कारमध्ये बसवले.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेने कारमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. आरोपीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला कारमध्ये बसवले. पीडित महिला आरोपीला ओळखत होती. आरोपीने पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर त्याने बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पीडित महिला सेक्टर १४२ मध्ये राहते. तुम्हाला तुमच्या घरी सोडतो असे सांगून आरोपीने पीडित महिलेला गाडीत बसण्यास सांगितले.

आरोपीशी ओळख असल्यामुळे महिला विश्वास ठेऊन त्याच्या गाडीत बसली. आरोपी एटीएम शोधण्याच्या बहाण्याने गाडी फिरवत होता. नंतर त्याने गुंगीचे औषध मिसळलेले पेय पिण्यासाठी दिले व महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने परी चौकातून महिलेला लिफ्ट दिली होती. तिथेच त्याने तिला फेकून दिले असे महिलेने पोलिसांना सांगितले.

महिलेने पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा सुद्धा ती पूर्णपणे शुद्धीत नव्हती. महिला तिच्या सासू-सासऱ्यांना भेटून तिच्या घरी जात असताना आरोपीने तिला फोन करुन परी चौक येथे थांबण्यास सांगितले. दहा वाजता मी त्याच्या गाडीत बसले. घरी सोडतो सांगून तो फक्त गाडी फिरवत होता. मला उशीर होतोय असे सांगितल्यानंतर त्याने मला गुंगीचे औषध मिसळलेले पेय पिण्यासाठी दिले. ते पिल्यानंतर मला चक्कर आल्यासारखे होऊ लागले. माझी शुद्ध हरपली. त्याने निर्जन स्थळी गाडी नेऊन तिथे माझ्यावर बलात्कार केला. त्याने पहाटे चारच्या सुमारास मला परी चौक येथे फेकून दिले असे पीडित महिलेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 12:19 pm

Web Title: woman offered lift raped in car dmp 82
Next Stories
1 चॅनेल्सडकडून ‘ऑफर’चा भडीमार; ट्राय आणणार बंधने
2 अमेरिकेने पाकिस्तानला दिला झटका, आर्थिक मदतीमध्ये मोठी कपात
3 Article 370 : जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सुरू
Just Now!
X