05 March 2021

News Flash

गरबा खेळताना महिला ह्दयविकाराच्या झटक्याने कोसळली, काही सेकंदात मृत्यू

तिचं मूल तिच्याकडे चालत जातं. त्याला ती उचलून घेते आणि....

एखादा समारंभ, लग्न सोहळयात नृत्य करत असताना, त्रास झाल्यास आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना गुजरातच्या गांधीनगरमध्ये घडली. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गांधीनगरच्या रुपल गावामध्ये ही दुर्देवी घटना घडली. कल्पनाबेन गाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. एका कौटुंबिक विवाह सोहळयात गरबा खेळत असताना कल्पनाबेन यांचा मृत्यू झाला. गरबा खेळताना महिलेला ह्दयविकाराचा झटका आल्याचे या व्हिडीओ फुटेजमध्ये दिसते. अवघ्या काही सेंकदांमध्ये महिलेचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

व्हिडीओ फुटेजमध्ये कल्पनाबेन गरबा खेळताना दिसत आहे. तिचं मूल तिच्याकडे चालत जातं. त्याला ती उचलून घेते आणि तितक्यात खाली कोसळते. त्यावेळी आजूबाजूला गरबा खेळणाऱ्या महिला तिच्या दिशेने धावत जातात. पण काही सेकंदात जागीच तिचा मृत्यू झाला. कल्पनाबेन गाडवीला ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. पण गरबा खेळताना तिला ते समजलं नाही आणि ती जमिनीवर कोसळली असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 11:03 am

Web Title: woman playing garba suffers heart attack dies within seconds in gujarats gandhinagar dmp 82
Next Stories
1 अमेरिका : २४ तासांत करोनामुळे ३ हजार मृत्यू; फायझर लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी
2 ‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू
3 शेतकरी आज करणार ‘चक्का जाम’; दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करण्याचा निर्णय
Just Now!
X