22 July 2019

News Flash

धक्कादायक! लग्नाच्या रात्रीच नववधूवर नवऱ्याने आणि दीराने केला सामूहिक बलात्कार

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूवर नवऱ्याने आणि दीराने मिळून सामूहिक बलात्कार केला. गंभीर बाब म्हणजे हे घडत असताना सासू-सासऱ्यांनी दरवाजाला कडी लावली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूवर नवऱ्याने आणि दीराने मिळून सामूहिक बलात्कार केला. गंभीर बाब म्हणजे हे घडत असताना सासू-सासऱ्यांनी बाहेरुन दरवाजाला कडी लावली होती. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करावे लागले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शस्त्रक्रियेनंतर आता या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सहा मार्चला या महिलेवर अत्याचार करण्यात आला. रविवारी या प्रकरणी एफआयआर दाखल झाला. घटनेच्यावेळी दोन्ही आरोपी दारुच्या नशेत होते असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. महिलेच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हुंडयाची मागणी करत होते असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. नवऱ्याने आणि दीराने लग्नाच्या रात्री दारु पिऊन वधूवर अत्याचार केला. नवऱ्याच्या कुटुंबाला पैशांची हाव होती. ते हुंडयाची मागणी करत होते. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी सात लाख रुपये खर्च केले होते असे पीडित मुलीच्या भावाने सांगितले. ३७६ डी, ५०६ आणि ५०४ कलमातंर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. पीडित महिलेला जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक आलोक शर्मा यांनी दिली.

First Published on March 15, 2019 2:45 pm

Web Title: woman raped by husband and his brother in law on wedding night