राजस्थानच्या अलवार येथे पोलिस सब-इन्स्पेक्टरने एका २६ वर्षीय महिलेवर तीन दिवस बलात्कार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. ही महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती .

हा गुन्हा पोलिस स्टेशनच्या कंपाऊंडमध्ये आरोपी सब-इन्स्पेक्टरच्या राहत्या खोलीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या पतीविरूद्ध केलेल्या तक्रारीबाबत २ मार्च रोजी पोलिस सब-इन्स्पेक्टरशी संपर्क साधला होता.

२०१८ मध्ये तिने तिच्या पतीविरोधात हुंडा मागण्याबद्दल आणि त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. यावर नंतर तोडगा निघाला होता. पण आता तिचे असे म्हणने आहे की, तिच्या नवऱ्याला तीच्यापासून घटस्फोट घ्यायचा होता आणि ते तिला मान्य नव्हते. अलवार पोलिस अधीक्षकांनी सोमवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ही तक्रारदार महिला पोलिस स्टेशनमध्ये आली होती आणि यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी तिने सब-इन्स्पेक्टरशी संपर्क साधला होता.

या महिलेने असा आरोप केला आहे की, या अधिकाऱ्याने अजून एका साथिदारासह २ मार्च ते ४ मार्च दरम्यान तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. रविवारी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सब-इन्स्पेक्टरविरूद्ध निलंबन व अन्य शिस्तभंगाची कारवाई महानिरीक्षक कार्यालयातून सुरू करण्यात आली आहे. आम्ही एसएचओवर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आहोत. अलवार एसपी म्हणाले की, जे एका वर्षाहून अधिक काळ तेथे तैनात आहेत अशा सर्व कर्मचार्‍यांना पोलिस ठाण्यावर पाठविण्याच्या विचारात आहोत. सदर महिलेचे विधान दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवले जाईल आणि याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.