बदाऊन शहरातील कोतवाली भागात एक महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. विकास, अखिलेश आणि पप्पू अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती संबंधित महिलेने पोलिसांना दिली.
तिन्ही आरोपी रविवारी रात्री बळजबरीने महिलेच्या घरात घुसले. विकासने महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवला. त्यानंतर अखिलेश आणि पप्पूने तिच्यावर बलात्कार केला, असे अतिरिक्त पोलील अधीक्षक ओमप्रकाश यादव यांनी सांगितले.
सोमवारी या महिलेने पोलिसांकडे तिन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तिन्ही आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.