News Flash

धक्कादायक! ९० वर्षांच्या आजीला अमानुष मारहाण, शेजारी बनवत बसले व्हिडिओ

आजीला मारहाण करणारी नात अटकेत

९० वर्षांच्या एका आजीबाईंना तिच्याच नातीने अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. धक्कादायक बाब ही या आजीला मारहाणीपासून वाचवण्याऐवजी शेजारी या मारहाणीचा व्हिडिओ तयार करत बसले. हा व्हिडिओ पाहून आपले हृदय पिळवटून जाते. ही घटना घडली आहे केरळच्या कन्नूर या गावात. या आजीला मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव दीपा आहे तर आजींचे नाव कल्याणी असल्याचे समजले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपाला अटक केली असून तिच्या विरोधात बेदम मारहाणीसंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडेही या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. कल्याणी यांची संपत्ती बेकायदा हडप केल्याप्रकरणीही दीपावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी यांच्यावर आता रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

दीपाने तिच्या आजीला चपलेने मारहाण केली. त्यानंतर तिची आजी म्हणजेच कल्याणी या जोरजोरात आरडाओरडा करू लागल्या. शेजारी धावत आले पण त्यांनी या आजींची सुटका करण्याचे सोडून व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहचला. मग पोलिसांनी याप्रकरणी दीपाला अटक केली आणि तिची रवानगी पोलीस कोठडीत केली. दीपाने स्वतःच्या आजीला ज्या प्रकारे मारहाण केली ते तर भयंकर आहेच पण शेजाऱ्यांनीही असंवेदनशीलतेचा कळस गाठला.

कल्याणी यांचाही जबाब नोंदवण्यात आला. माझी नात मला रोज मारहाण करते असे या आजींनी सांगितले आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आणि वळ आहेत. २०१६ मध्येही अशीच एक क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये दिल्लीत कालका या ठिकाणी एक मुलगी तिच्या ८५ वर्षांच्या आईला मारहाण करत होती असे दिसून आले होते. यानंतर पोलिसांनी या महिलेच्या घरी एक पथक पाठवले मात्र त्यावेळी त्या महिलेने तक्रार नोंदवली नव्हती. या प्रकरणात मात्र दीपाला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्याविरोधात मारहाणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 10:03 pm

Web Title: woman seen assaulting 90 year old grandmother in viral video arrested
Next Stories
1 भाजपा-काँग्रेस मुक्त भारतासाठी ममता बॅनर्जी-चंद्रशेखर राव आले एकत्र
2 जेएनयूचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा, अश्लील चाळे करणाऱ्या प्राध्यापकाच्या अटकेची मागणी
3 विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट केल्याने महिलेची आत्महत्या
Just Now!
X