07 July 2020

News Flash

पाकिस्तानात महिलेस जिवंत जाळले

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने विवाहाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या महिलेस जिवंत जाळले.

| June 30, 2014 02:06 am

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने विवाहाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या महिलेस जिवंत जाळले.
तोबा टेक सिंग जिल्ह्य़ात ही घटना घडली असून सदर तरूणाने या महिलेच्या घरात घुसून तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. तिने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात त्याने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळले असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. तिला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. संशयित तरूणास अटक करण्यात आली असून महिलेच्या कुटुंबीयांनी मृत महिलेला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत निदर्शने केली. या तरूणाने तिची यापूर्वी अनेकदा छेडही काढली होती. तिच्या बहिणीशीही त्याचा वाद झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2014 2:06 am

Web Title: woman set ablaze in pakistan
टॅग Pakistan
Next Stories
1 पुढील वर्षांपर्यंत दिल्लीत तीन हजार महिला पोलीस
2 चेन्नईतील इमारत दुर्घटनेत नऊ जण मृत्युमूखी
3 सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील राजदूतांची बैठक
Just Now!
X