News Flash

महिलेने पाच महिन्याच्या बाळाला जिवंत पेटवलं; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

महिलेला अटक

प्रतिकात्मक

मध्य प्रदेशात महिलेने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुड्डी सिंह गोंड असं या २७ वर्षीय महिलेचं नाव असून सुखर गावात हा प्रकार घडला आहे. महिलेने आग लावून आपल्या बाळाला त्यात फेकून दिलं असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक स्थिती योग्य नसून तिेने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपल्या मुलाची हत्या कधी केली हे आठवत नसल्याचं महिला सांगत आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे. महिलेच्या सासूने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बाळ सारखं रडत असल्यानेच सुनेने पेटवून देत त्याची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आणखी वाचा- २८ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीची हत्या; ख्रिसमची लाईटिंग पाहून रचला होता कट

आरोपी महिलेला तीन मुली असून मुलाच्या जन्मानंतर ती विचित्र वागू लागली होती. मांत्रिकाच्या माध्यमातून तिच्यावर उपाचरही सुरु होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकारात मांत्रिकाचा काही हात आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत. नरबळी म्हणून ही हत्या करण्यात आली असावी असा कुटुंबीयांना संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 10:46 am

Web Title: woman sets her 5 month old baby boy on fire in madhya pradesh sgy 87
Next Stories
1 Coronavirus – देशभरात २४ तासांत २० हजार २१ नवे करोनाबाधित, २७९ रुग्णांचा मृत्यू
2 ६४ व्या वर्षी MBBS अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश; SBI मधील निवृत्तीनंतर पूर्ण करणार डॉक्टर होण्याचं स्वप्न
3 क्रिकेटनंतर राजकारणामध्येही दादागिरी?; सौरभ गांगुलीच्या त्या ‘अराजकीय’ भेटीनंतर चर्चांना उधाण
Just Now!
X