News Flash

‘त्या तरुणीला इतक्या रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरायची गरजच काय होती?’

हरियाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टीचे वादग्रस्त विधान

पीडित तरुणी वर्णिका कुंडू आणि आरोपी विकास बराला

हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर छेडछाडीचे आरोप झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जाते आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या गाडीचा रात्री उशिरा पाठलाग करुन छेडछाड केल्याचा आरोप सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर आहे. या प्रकरणात हरियाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी विकास बरालाचा बचाव करताना वादग्रस्त विधान केले आहे. पीडित मुलगी इतक्या उशिरा रात्री का फिरत होती, असा प्रश्न विचारत भट्टी यांनी नवा वाद निर्माण केला आहे.

‘तरुणींनी रात्री १२ नंतर बाहेर फिरायला नको. संबंधित तरुणी इतक्या उशिरा का फिरत होती?,’ असा प्रश्न हरयाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी सीएनएन १८ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला. ‘सध्याचे वातावरण चांगले नाही. आपल्याला स्वत:लाच स्वत:चे संरक्षण करावे लागते. त्या तरुणीला रात्री उशिरा गाडी चालवायला नको होती,’ असेही भट्टी पुढे बोलताना म्हणाले. भट्टी यांच्या या विधानामुळे आणखी वाद होण्याची शक्यता आहे.

हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने मागील आठवड्यात रात्री उशिरा एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या गाडीचा पाठलाग केला होता. यानंतर विकासने तरुणीची छेडदेखील काढली होती. संबंधित तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यावर विकास बरालाला अटकदेखील करण्यात आली. मात्र यानंतर विकासची जामिनावर सुटका झाली. या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातून सुभाष बराला आणि भाजपवर टीका करण्यात येते आहे. सुभाष बराला यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 5:23 pm

Web Title: woman shouldnt have gone out so late in the night says haryana bjp vice president ramveer bhatti on chandigarh stalking case
Next Stories
1 शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड!
2 ‘मुलावरील छेडछाडीच्या आरोपांवरुन सुभाष बरालांनी राजीनामा द्यावा’
3 भाजप नेत्याने रुग्णवाहिका अडवल्याने रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप
Just Now!
X