News Flash

धक्कादायक! डझनहून जास्त वेळा पतीला चाकूने भोसकलं आणि लिहिली फेसबुक पोस्ट; त्यानंतर…

पोलिसांकडून तपास सुरु

प्रातिनिधिक

पत्नीने पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने फेसबुकवर पोस्ट लिहिली यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीमधील छत्तरपूर येथे ही घटना घडली आहे.

रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. घरमालकाने संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. गस्त पथक घऱी पोहोचलं असता आतून दरवाजा लॉक करण्यात आलेला होता. पोलिसांना अखेर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करावा लागला. यावेळी पती आणि पत्नी दोघंही बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसलं. घराच्या भिंती आणि जमिनीवर रक्ताचे डाग दिसत होते.

यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेतून दांपत्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. पण पतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त अतुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पती चिराग शर्मा हरियाणामधील यमुनानगरचा रहिवासी होता. तर पत्नी रेणुका मध्य प्रदेशातील उज्जैन येथील आहे. एकाच कंपनीत दोघे कामाला होते. २०१३ मध्ये दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दांपत्याला मूल बाळ नव्हतं. अनेकदा त्यांच्यात छोट्या कारणांवरुन भांडण होत असे”.

आणखी वाचा- पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून ११ कोळसा खाण कामगारांची अपहरण करुन हत्या

रविवारी दोघांमध्ये जोराचं भांडण झालं. यानंतर पती चिराग आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. यावेळी पत्नीने किचनमधील चाकूच्या सहाय्याने त्याच्यावर डझनहून जास्त वेळ वार केले. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे.

यानंतर आरोपी पत्नी रेणुकाने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट करत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. फेसबुक पोस्ट दांपत्याच्या अनेक मित्रांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी घरमालकाला फोन लावला आणि यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. आरोपी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:50 am

Web Title: woman stabs husband dozen times before attempting suicide in new delhi sgy 87
Next Stories
1 वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल
2 आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा
3 नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं राष्ट्रवाद नव्हे – सचिन पायलट
Just Now!
X