डॉक्टरांनी एका महिलेच्या डाव्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याने तिला आता चालता येणं अशक्य होतं आहे. ओदिशा येथील रुग्णालायात हा प्रकार घडला आहे.उप जिल्हाधिकारी कार्यालयात एका महिलेच्या डाव्या पायाऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डावा पाय दुखतो म्हणून ही महिला उपचारांसाठी या रूग्णालयात दाखल झाली होती. आता डॉक्टरांनी डाव्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याने तिला चालताना अडचण होते आहे.

मित्राणी जेना असे या महिलेचे नाव आहे. भुवनेश्वरपासून 220 किमी अंतरावर असलेल्या एका गावात ही महिला रहाते. तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली, हा पाय दुखू लागला. त्यामुळे ही महिला उपजिल्हाधिकारी रूग्णालयात दाखल झाली. तिथे तिला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेसाठी नेले. तिथे तिच्या डाव्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मला शस्त्रक्रियेच्या आधी भूल देण्यात आली होती. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला हे लक्षात आले की माझ्या डाव्या पायाऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे पाहून मला धक्काच बसला. याबद्दल मी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मी तक्रार केल्यानंतर माझ्या डाव्या पायावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आता मला असह्य त्रास होतो आणि चालताही येत नाही असे या महिलेने सांगितले आहे. माझ्या नवऱ्याने तक्रार केली म्हणून या डॉक्टरांनी माझ्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया केली. मात्र या रूग्णालयाने माझ्या शस्त्रक्रियेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्याची किंमत आता मला मोजावी लागते आहे. त्यामुळे या रूग्णालयाविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने केली आहे.