आयुष्यात प्रत्येक निर्णय महत्वाचा असतो. एखादा निर्णय आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. मात्र अनेकदा असे निर्णय घेताना गोंधळ होतो आणि त्याचा विपरित परिणाम आयुष्यावर होतो. अनेकजण महत्वाचे निर्णय घेतला कुटुंबामधील व्यक्तींना किंवा जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेतात. मात्र ब्रिस्टॉनमधील एक तरुणी या सर्व गोष्टींना कंटळाली असून आता आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. नाही नाही ती लग्न करण्याच्या विचारात नसून ती निर्णय घेण्यासाठी एखादी पगारी व्यक्ती शोधत आहे. तिच्यासाठी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला ती दरमहा दोन हजार पाऊण्ड म्हणजेच जवळजवळ १ लाख ८५ हजार रुपये पगार देण्यासही तयार आहे.
ब्रिटनमधील या महिलेने बार्क डॉटकॉमवर याबद्दल महिती दिली आहे. या महिलेने आपला नाव जाहिर केले नाही असं मिरर या वेबसाइटने म्हटले आहे. या वेबसाईटवर ती लिहीते, ‘हे जरा तुम्हाला विचित्र वाटू शकतं. पण मला असं वाटतयं की माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी कोणाचा तरी शोध घेत आहे. निर्णय घेण्याबाबतीत माझे मागील वर्ष अगदी भयंकर गेले आहे. त्यामुळे खरंच कोणीतरी माझ्या आयुष्यावर ताबा घेत माझ्यासाठी सर्व निर्णय घ्यावेत. पण हे खरचं कसं होईल मला ठाऊक नाही. पण जर मला इतर सेवा मिळू शकतात तर ही संकल्पना राबवण्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं.’
मागील वर्षभरातील आपले निर्णय कसे चुकले याबद्दलही तिने या पोस्टमध्ये लिहीले आहे. एका मित्राला दिलेले कर्जाचे सर्व पैसे बुडले, न्यूझिलंडमध्ये एकटी फिरायला गेले होते तेव्हा माझ्याकडील सर्व पैसे संपल्याने अडकून पडले, शिवीगाळ करुन जोडीदार निघून गेला तसेच एकदा घरी येत असताना चोरांनी मला लुटले असे अनेक प्रसंग तिने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहेत. ‘या सर्वांवरुन मी माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्यास सक्षम नाही या निष्कर्षापरी मी पोहचले आहे. प्रत्येक आठवड्यात माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडत असते. याला मी कंटाळले आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे,’ असं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आयुष्याची ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मी एका व्यक्तीचा शोध घेत आहे. या व्यक्तीने एका महिन्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय घेण्यासाठी मला मदत करावी. त्या व्यक्तीने माझ्यासाठी २४ तास उपलब्ध असावे. या निर्णयांमध्ये अगदी टिंडरवर मी कोणाशी बोलावे यापासून ते अगदी मी माझ्या बचत खात्यामधील पैसे कोणत्या गोष्टींसाठी खर्च करावे असे सर्वच निर्णय घ्यावे लागतील. मुळात एका फोन कॉलवर किंवा मेसेजवर कधीही, कुठेही मदत करणारी व्यक्ती हवी आहे असं या पोस्टमध्ये या मुलीने म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 4:46 pm