News Flash

पाच लाखात मिळाले ओळखपत्र, बनावट ‘आयएएस’चा गौप्यस्फोट

आयएएस अधिकारी असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून उत्तराखंडच्या मसुरी शहरातील प्रतिष्ठीत लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत बिनधास्तपणे तब्बल सहा महिने मुक्काम ठोकणाऱया एका महिलेने गुरूवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर

| April 2, 2015 06:07 am

आयएएस अधिकारी असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून उत्तराखंडच्या मसुरी शहरातील प्रतिष्ठीत लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत बिनधास्तपणे तब्बल सहा महिने मुक्काम ठोकणाऱया एका महिलेने गुरूवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. अकादमीतील एका अधिकाऱयाने नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल पाच लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच त्या अधिकाऱयानेच आपल्याला अकदामीत राहण्यासाठी खोटे ओळखपत्र बनवून दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
रुबी चौधरी नावाच्या महिलेने आयएसएस अधिकारी असल्याचे भासवून गेले सहा महिने या अकादमीत मुक्काम ठोकला आणि फरार झाली. ती फरार झाल्यानंतर तिने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले. यानंतर आरोपी रुबी चौधरीने गुरूवारी स्वत:हून माध्यमांसमोर येऊन हा खळबळजनक खुलासा केला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात एका कार्यक्रमात संबंधित अधिकाऱयाशी ओळख झाल्याचे रुबी चौधरीचे म्हणणे आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये अकादमीच्या कॅम्पसला पहिल्यांदा भेट दिली होती. तसेच अकादमीतील ग्रंथालयात नोकरीसाठी अर्ज देखील दाखल केल्याचा दावा रुबी चौधरीने केला आहे. त्यावर माझ्याकडे अधिकाऱयाने नोकरीसाठी पाच लाखांची मागणी केली. आपण अधिकाऱयावर विश्वास ठेवून पाच लाख रुपये दिले एवढीच माझी चूक झाल्याचेही तिचे म्हणणे आहे. मात्र, पैसे देऊनही नोकरी काही मिळाली नाही.त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणी अकादमीचे उपसंचालक सौरभ जैन यांच्याकडून खुलासा मागवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2015 6:07 am

Web Title: woman who stayed illegally at ias academy claims to have paid bribe to senior officer
टॅग : Ias
Next Stories
1 बँकांनी गरिबांचे दु:ख जाणावे- नरेंद्र मोदी
2 दीपिकाच्या ‘माय चॉईस’नंतर विराट, रैनाचा महिलांच्या अधिकारांवर भाष्य करणारा व्हिडिओ
3 सोनिया गोऱ्या म्हणून स्वीकार
Just Now!
X