24 September 2020

News Flash

चीनमधील शाळेत चाकूधारी महिलेच्या हल्ल्यात १४ मुले जखमी

या हल्ल्यामागचा हेतू समजू शकला नाही. समाजमाध्यमांवरील माहितीनुसार या महिलेची सरकारविरोधात तक्रार होती.

| October 27, 2018 03:05 am

(संग्रहित छायाचित्र)

बीजिंग : येथे शुक्रवारी एका चाकूधारी महिलेने नैऋत्य चीनमधील चोंगक्विंग शहरात बालशिशुवर्गातील मुलांवर हल्ला केला असून त्यात १४ मुले जखमी झाली आहेत. या महिलेला शिक्षक व सुरक्षारक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोंगक्विंग येथे एका महिलेने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चाकूने मुलावंर हल्ला केला. सकाळच्या व्यायामानंतर ही मुले वर्गात परत जात असताना तिने हे कृत्य केले.

बनान जिल्ह्यातील युडाँग न्यू सेंच्युरी किंटरगार्टन शाळेत हा प्रकार झाला असून जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत काही समजू शकले नाही. या महिलेचे नाव लिउ असे असून तिला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती साउथ चायना मॉर्निग पोस्टने स्थानिक प्रसारण संस्थेच्या हवाल्याने दिली आहे. या हल्ल्यामागचा हेतू समजू शकला नाही. समाजमाध्यमांवरील माहितीनुसार या महिलेची सरकारविरोधात तक्रार होती.

या घटनेचे मोबाइल चित्रण प्रसारण संस्थेने दाखवले असून त्यात संशयित महिलेला पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर जखमी मुलांना रुग्णालयात नेताना दिसत आहेत. ही चित्रफीत चिनी समाजमाध्यमांवर टाकण्यात आली असून त्यात लहान मुले रक्ताने माखलेली दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारातच मुलांवर हल्ला करण्यात आला. मुलांना रक्ताने माखलेले पाहून  लोक रडत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:05 am

Web Title: woman with knife injures 14 children at western china school
Next Stories
1 लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात गुगलमध्ये ४८ जणांवर कारवाई
2 साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने केला बलात्कार
3 न्यायालयाचा निकाल सकारात्मक : जेटली
Just Now!
X