News Flash

‘जुगारात पत्नी हरला, जिंकणाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला’

महिलेचा धक्कादायक आरोप

प्रातिनिधीक छायाचित्र

मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये ३८ वर्षीय महिलेने एक धक्कादायक आरोप केला आहे. पती जुगारात हरल्यामुळे दोन व्यक्तींनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेकडून करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणाची संपूर्ण पडताळणी न झाल्याने कोणाताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘महिलेच्या तक्रारीनंतर प्रकरणाशी संबंधित असलेल्या सगळ्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहेत,’ अशी माहिती महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती शर्मा यांनी दिली आहे. ‘अद्याप या प्रकरणाची पडताळणी व्हायची आहे. त्यामुळे महिलेच्या आरोपांनंतर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,’ अशी माहिती ज्योती शर्मा यांनी दिली.

‘मंगळवारी संबंधित महिलेने जनसुनावणी दरम्यान (सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी घेण्यात येणारा साप्ताहिक कार्यक्रम) पतीवर आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी जुगार खेळताना पतीने आपल्याला पणाला लावले होते. यानंतर पती जुगारात हरला आणि नौशाद, घनश्याम या दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप जनसुनावणीमध्ये संबंधित महिलेने केला होता. नौशाद आणि घनश्यामसोबत आपला पती जुगारात हरला होता,’ अशी तक्रार महिलेने केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पती जुगारात हरल्याने आणि दोघांनी बलात्कार केल्यावर महिला पतीपासून वेगळी राहात आहे. मात्र यानंतर पती आणि जुगारात जिंकलेले दोघेजण त्रास देत असल्याची व्यथा महिलेने मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 4:54 pm

Web Title: women allegedly gangraped after husband lost her in gambling
Next Stories
1 काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; दोन भारतीय जवान शहीद
2 Video: चालकाशिवाय मालगाडी सुसाट धावली अन्…
3 जीएसटीचा निषेध : मुंबईतील कापड व्यापारी संपावर जाण्याची शक्यता
Just Now!
X