कोविड- 19 महामारीच्या काळात उशीरापर्यंत काम करणं आणि घरून काम करण्याच्या व्यवस्थेत महिलांना सर्वाधिक काम करावं लागलं. त्यांना कार्यालयनी कामकाजाबरोबरच काळजीवाहकाची भूमिका देखील निभवावी लागली. भारतात ८० टक्क्यांहून अधिक काम करणाऱ्या महिलांवर कोविड-19 काळात नकारात्मक परिणाम झाला आहे. कामातील आयुष्य संतुलीत ठेवणं सर्वात कठीण झालं आहे. भारताच्या औपचारिक क्षेत्राताली महिला कामगारांवर कोविड-19 च्या प्रभावाशी संबंधित एका रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे.

अस्पायर फॉर हर आणि सस्टेनेबल अॅडव्हान्समेंटने आज ‘वुमेन@वर्क’चा रिपोर्च जाहीर केला. या रिपोर्टनुसार सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या काम करणाऱ्या महिलांमध्ये ३८.५ टक्के महिलांनी म्हटले की, घरचे काम वाढल्याने, मुलांचे संगोपन करण्याबरोबरच, वृद्धांची काळजी घेण्यासारख्या कामांमुळे त्यांच्यावर प्रतिकुल परिणाम झाला. ४३.७ टक्के महिलांनी सांगितले की कामातील आयुष्य संतुलीत बनवणं सर्वात कठीण आहे.

हा रिपोर्ट सादर करण्यात आल्याच्या भागाच्या रूपात एख व्हर्च्युअल पॅनलच्या चर्चेचे देखील आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये तज्ज्ञ व नावाजलेल्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, सुश्री मधुरा सिन्हा(संस्थापक, अस्पायर फॉर हर), डॉ. नयन मित्रा(संस्थापक, सस्टेनेबल अॅडव्हान्समेंट), सुश्री निष्ठा सत्यम(डेप्युटी कंट्री रिप्रिंझेंटिव्ह, यूएन वुमेन) आणि सुश्री नव्या नवेली नंदा(संस्थापक, प्रोजेक्ट नवेली आणि सह-संस्थापक व सीएओ आरा हेल्थ) हमिंगबर्ड अॅडव्हाजर्सच्या सीईओ पोर्णिमा शेनॉय यांनी याचे संचलन केले.

या रिपोर्टनुसार सहभागी होण्याऱ्यांपैकी जी बहुतांश प्रतिक्रिया आली ती म्हणजे, महामारीच्या काळात त्यांना अधिक काळ कष्टाबरोबर काम करावं लागलं. यामुळे काम व जीवनातील संतुलन बिघडले. करिअरच्या मध्यातील (१६-२० वर्षे कामाचा अनुभव) असणाऱ्या महिलांमध्ये ५०.४ टक्के महिलांनी याचे कारण सांगितले. घराच्या कामाचा वाढलेला व्याप, यामध्ये मुलं व वृद्धांच्या देखभालीचा समावेश आहे आणि हे लोकसंख्येच्या कोणत्याही अन्य भागाच्या तुलनेत जास्त आहे.