28 February 2021

News Flash

नवऱ्यामुळे झाला गुप्तरोग, महिलेची थेट पोलीस ठाण्यात तक्रार

महिला गृहिणी तर तिचा नवरा इंटिरिअर डिझायनर आहे.

एका महिलेने नवऱ्यामुळे आपल्याला गुप्तरोगाची लागण झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आपल्याला शारीरिक संबंधातून परसरणाऱ्या लैंगिक आजाराची लागण झाली आहे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिला अहमदाबादच्या वेजालपूर येथे राहणारी आहे. तिने नवरा आणि सासू-सासऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.

वेजालपूर येथे राहणाऱ्या महिलेचं नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या मुलाबरोबर २०१७ साली लग्न झालं होतं. महिला गृहिणी तर तिचा नवरा इंटिरिअर डिझायनर आहे. बऱ्याचदा नवरा सकाळी घर सोडायचा, ते उशिराने घरी परतायचा. त्यानंतर तिला नवऱ्याचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. सासू-सासरे सुद्धा मला माझ्या वर्णावरुन टोमणे मारायचे असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. नवऱ्याने २०१८ साली तिला घराबाहेर काढले. त्यानंतर काही काळाने त्यांच्यातील भांडण मिटले. ते शेला येथे घर घेऊन स्वतंत्रपणे राहू लागले.

लॉकडाउनच्या काळात नवरा आणि ती सासू-सासऱ्यांकडे रहायला गेली. नवरा त्यावेळी काही औषधे घेत होता. ती औषधे कसली आहेत ते त्याने सांगितले नाही. पण काही दिवसांनी नवऱ्याप्रमाणे तिच्या शरीरावरही लाल रंगाचे व्रण उमटले. त्याने तिला तीच औषधे घ्यायला सांगितली. काही दिवसांनी तिला ती त्वचा रोगावरील औषधे असल्याचे समजले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 2:30 pm

Web Title: women contracts std files complaint against husband dmp 82
Next Stories
1 भारताविरोधातील आक्रमकता थांबवा; अमेरिकेचा संरक्षण विधेयकातून चीनला सल्ला
2 “करोना पण विचित्र आहे; NEET/JEE, निवडणुका, सरकार पाडताना Inactive होता आता अधिवेशनाला Active झालाय”
3 …तर शेतकऱ्यांसोबतची पुढची चर्चाही निष्फळ होईल; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं
Just Now!
X