News Flash

फिगर राखण्यासाठी महिला टाळतात स्तनपान – आनंदीबेन पटेल

आनंदीबेन पटेल यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद?

शहरातील स्त्रिया त्यांच्या लहान बाळांना स्तनापान करणे टाळतात. त्यांना त्यांच्या फिगरची चिंता असते म्हणून त्या असा निर्णय घेतात. बाळाला अंगावरचे दूध पाजले तर आपली फिगर खराब होईल असे शहरातल्या स्त्रियांना वाटते त्याचमुळे त्या बाळांना बाटलीने दूध प्यायची सवय लावतात. जन्मापासूनच बाळाला बाटलीने दूध पाजले जाते. मात्र ज्याप्रमाणे बाटली फुटते तसेच त्यांचे नशीबही फुटते अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवाहित नाहीत असे वक्तव्य करून आनंदीबेन पटेल यांनी खळबळ उडवून दिली होती. या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी विवाहित आहेत, माझ्यासाठी ते प्रभू रामचंद्र आहेत असे उत्तर दिले. आता वाद कुठे शमतो न शमतो तोच शहरातील स्त्रिया फिगर राखण्यासाठी बाळाला स्तनपान करत नाहीत असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 6:11 pm

Web Title: women in cities these days dont breastfeed babies as they fear their figure will be affected says anandiben patel
Next Stories
1 भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिम आणि दलितांविरोधात विष पसरवले जाते आहे-ओवेसी
2 मेलेनिया-इवांकामुळे ट्रम्प यांनी तो वादग्रस्त निर्णय घेतला मागे
3 ‘हिंदू चोर’ नाटकाच्या नावावरून सुरु झाला वाद
Just Now!
X