महिला न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या
चीनमध्ये न्यायाधीशांवर हल्ले वाढले असून अनेकदा त्याच्या बातम्याही ठळकपणे प्रसिद्ध होत आहेत. २००५ मध्ये हुनान येथील एका शेतकऱ्याने देशी बनावटीच्या स्फोटकांची पिशवी न्यायालयात पाठवली होती व त्यानंतरच्या स्फोटात एक ठार, तर इतर दोन जण जखमी झाले होते. हुबेई येथे गेल्या वर्षी एका कामगार वादात चार न्यायाधीशांना भोसकण्यात आले होते.
दोन आठवडय़ांपूर्वी बीजिंगमध्ये मा कैयून येथे एका महिला न्यायाधीशास दोनजणांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्यांच्या घटस्फोटातील तडजोडीबाबत ते दोघे समाधानी नव्हते अर्थात त्या दोघांनी त्या हल्ल्यानंतर लगेचच आत्महत्याही केली होती. या हिंसाचाराचा निषेध करताना काहींनी म्हटले आहे की, हा िहसाचार अविचारीपणाचा आहे व लोक या टोकाला का जातात हे समजत नाही, ते व्यवस्थेविरोधातील राग व्यक्त करीत आहेत. जर या लोकांचे ऐकून घेणारे कुणी असेल तर हा हिंसाचार थांबू शकेल. न्यायदान प्रक्रियेत समाजाला शेवटचे आशास्थान न्यायाधीश असतात व त्यात भांडणे सोडवली जाणे अपेक्षित असते. याबाबत अंतिम तोडगे न्यायाधीश काढत असले तरी त्यात कमकुवत गटांबाबत आदर दाखवला गेला पाहिजे. रोमन तत्त्वज्ञ व वकील मार्कस टुलियस सिसेरो यांनी असे म्हटले होते की, एक लक्षात ठेवा की न्याय हा शेवटच्या माणसालाही मिळाला पाहिजे. एका कनिष्ठ न्यायाधीशाने सांगितले की, दरवर्षी शंभर प्रकरणे हाताळावी लागतात त्यामुळे वेळ व सहनशीलता यांना मर्यादा असतात कारण दाव्यातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. अनेकदा लोकांचे शिक्षण कमी असते त्यामुळे त्यांना न्यायदानातील तर्काचा अर्थ लागत नाही. चीनमध्ये अलीकडे न्यायाधीश हे वकिलांच्या युक्तिवादाआधारे निकाल देत नाहीत ते त्यांच्या तर्क व दृष्टिकोनावर निर्णय घेतात. न्यायाधीशांच्या कामाचा भार कमी करणे आवश्यक आहे पण त्याचबरोबरीने कामाचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे व त्याचा सामाजिक परिणामही बघावा लागतो. अपिलासाठी फार कमी मार्ग असले तरी निकालांनी लोकांचे समाधान होत नाही. न्यायासनाकडून पराभूत झाल्यानंतर ते निराशेतून सुडाने वागतात. दारिद्य््रा, सामाजिक अन्याय या गोष्टी अजून पूर्ण नष्ट झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने मा कैयून यांच्या दुर्दैवी मृत्यूवर म्हटले आहे की, न्यायाधीशांना असे अधिकार असावेत ज्यामुळे न्यायालयीन आदेशावर अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करता येईल.
न्यायालयात वादविवाद होतात त्यातून आणखी समस्या निर्माण होतात व त्यातून मार्ग काढण्यासाठी स्फोटक सामाजिक प्रश्नांवर कायदे असले पाहिजेत. बचाव पक्षाचे वकील लोकांना न्यायालयाचा निकाल समजून सांगण्यास मदत करू शकतात तसेच व्यावसायिक ज्ञानातून तर्क विचार करण्यास शिकवले जाऊ शकते. वकिलांचा आवाज दडपणे म्हणजे अपिलातील पक्षकारांचे म्हणणे न ऐकण्यासारखे आहे. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती झाली त्यावेळी वकिलांवर बंदी घातली गेली. अगदी सार्वजनिक सुरक्षा अधिकारीही त्या कारवाईत भरडले गेले.