02 December 2020

News Flash

न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी

कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्याच आहेत

‘हिजाब’ची पहिली मानकरी झिना अली

न्यूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद्धतीचा आहे. कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्याच आहेत. झिना (वय ३०) या ख्राइस्ट चर्च दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी पोलीस दलात सामील झाल्या. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर हल्ला करण्यात आला, त्यात ५१ जण ठार झाले होते.

या आठवडय़ात त्या पोलीस अधिकारी झाल्या असून हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. झिना यांनी हा गणवेश तयार करण्यात मोठी भूमिका पार पाडली. यात धर्म व संस्कृती दोन्हींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:20 am

Web Title: women police in new zealand are allowed to wear hijab abn 97
Next Stories
1 ..तर काँग्रेस सोडा!
2 ‘फायझर’ची लस ९५ टक्के प्रभावी!
3 लडाखला चीनचा भाग दाखवल्याबद्दल ट्विटरने मागितली माफी; ३० नोव्हेंबरपर्यंत सुधारणार चूक
Just Now!
X