News Flash

तिहारमध्ये महिला कैद्याची आत्महत्या

तिहार कारागृहात गुरुवारी आणखी एका महिला कैद्याने आत्महत्या केली.

| March 14, 2013 07:53 am

तिहार कारागृहात गुरुवारी आणखी एका महिला कैद्याने आत्महत्या केली. दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी रामसिंग याने गेल्या सोमवारीच कारगृहातील खोलीमध्ये आपल्याजवळील कपड्यांच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा एका महिला कैद्याने आत्महत्या केल्याचे आढळले.
रेश्मा असे या महिला कैद्याचे नाव आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात ती २०११ पासून तिहार कारागृहात शिक्षा भोगत होती. गुरुवारी दुपारी कारागृहातील खोलीमध्ये रेश्माने गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने तिला दिनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या तिहार कारागृहातील गेल्या १५ महिन्यांतील ही चौथी आत्महत्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 7:53 am

Web Title: women tihar inmate commits suicide
टॅग : Tihar Jail
Next Stories
1 महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2 फ्रान्सिस प्रथम नवे पोप!
3 सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा केली चूक; एकाच निवेदनाचे दोनदा वाचन
Just Now!
X