07 April 2020

News Flash

प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांची आक्षेपार्ह तपासणी

महापालिका कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे गुरुवारी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे,

प्रतिनिधिक छायाचित्र

सुरत : सुरत महापालिकेतील प्रशिक्षणार्थी कारकून पदासाठी निवड करण्यात आलेल्या महिलांना महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी एकत्र नग्न अवस्थेत उभे करण्यात आल्याची धक्कादायक घटना सामोरी आली आहे.

सुरत महापालिका आयुक्त बनछानिधी पणी यांनी शुक्रवारी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दहा महिलांना रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात तपासणीसाठी नग्न उभे करण्यात आले होते. गुजरातमधील भुज शहरातील महाविद्यालयात  विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून त्यांना पाळी न आल्याची खातरजमा करण्यात आल्याच्या घटनेनंतर हा दुसरा प्रकार आहे. महापालिका कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे गुरुवारी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे, की विवाह न झालेल्या महिलांची गर्भवती नसल्याची तपासणी करण्यात आली. २० फेब्रुवारीला सुरत महापालिका वैद्यकीय संशोधन रुग्णालयात हा प्रकार झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:06 am

Web Title: women trainee clerks of surat municipal corporation made to stand naked for physical test zws 70
Next Stories
1 अमेरिका-तालिबान संभाव्य कराराकडे भारताचे लक्ष; ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चेची शक्यता
2 रुग्णसेवेसाठी विवाह लांबणीवर टाकलेल्या चिनी डॉक्टरचा मृत्यू
3 ‘डायमंड प्रिन्सेस’वरील आठ भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा
Just Now!
X