तिहेरी तलाकच्या मुद्दयावरून एकीकडे देशभरात वाद सुरू असतानाच दुसरीकडे देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा ए हिंदचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष नदीम उल वाजदी यांनी मुस्लिम महिलांच्या नोकरी करण्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. महिलांनी सरकारी किंवा बिनसरकारी, कोणत्याही प्रकारची नोकरी केली नाही पाहिजे. महिलांचे नोकरी करणे हे इस्लाम विरोधी आहे. घराचा खर्च उचलण्याची जबाबदारी पुरूषांची आहे. तर महिलांचे काम हे घर आणि मुलांची देखभाल करण्याचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा घरातील खर्च उचलण्यासाठी एखादा पुरूष नसेल तेव्हाच महिलांनी नोकरी करावी, असेही त्या म्हणाल्या. आपला संपूर्ण चेहरा झाकून त्यांनी काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, देवबंद नेहमी आपल्या फतव्या आणि वक्तव्यावरून चर्चेत असते. यापूर्वी दारूल उलूम देवबंदने फतवा जारी करताना घटस्फोटासाठी महिला उपस्थित राहणे आवश्यक नाही. पतीला मोबाइलवरूनही आपल्या पत्नीशी घटस्फोट घेता येईल. मोबाइल फोनवरून दिलेला घटस्फोट मान्य केला होता. त्यावेळी देवबंदवर मोठी टीका करण्यात आली होती.
यापूर्वी देवबंदकडून इस्लमसंबंधित अनेक वक्तव्ये आणि फतवे आले आहेत. ‘भारत माता की जय’ या घोषणेवरूनही दारूल उलूमने एक फतवा जारी केला होता. भारत माता की जय म्हणणे इस्लामासाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.