15 January 2021

News Flash

US Election : राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

एका ओळीचं ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी केला विजयाचा दावा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. अशात ही निवडणूक आपण जिंकलो आहे असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. विजयासाठी २७० इलेक्ट्रोल व्होट्सची गरज असते. याच्या जवळ जो बायडन असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ओळीचं ट्विट करत ही निवडणूक आपणच जिंकलो आहे असा दावा केला आहे. I WON THIS ELECTION, BY A LOT असं एका ओळीचं ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचं मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीसाठी काहीसा वेळ लागतो आहे. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या याच ट्विटची चर्चा रंगली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये ही लढत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीची मतमोजणी ही चांगलीच लांबली. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला आहे. एका ओळीचं ट्विट करत त्यांनी आपण ही निवडणूक जिंकलो असल्याचं म्हटलं आहे. मात्र ती कशी काय जिंकलो हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. दरम्यान जॉर्जिया आणि  पेनसिल्व्हेनिया यांच्यासह इतर राज्यांमध्ये बायडन यांनी आघाडी घेतली त्यामुळे बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील हे स्पष्ट होत असतानच डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्याचा दावा करणारं ट्विट केलं आहे. या ट्विटची चर्चा जगभरात होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 10:03 pm

Web Title: won this election by a lot trump tweets as biden edges closer scj 81
टॅग Donald Trump
Next Stories
1 Bihar Elections 2020 Exit Poll : बिहारमध्ये सत्तापालटाचा अंदाज; राजद-काँग्रेसला जनतेचा कौल
2 ‘पीएजीडी’चा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरमधील ‘डीडीसी’ निवडणूक लढवणार
3 करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच
Just Now!
X