दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेला कट्टरवादी हुर्रियत नेता मसरत आलम भट याला जम्मूच्या कारागृहातून काश्मीर खोऱ्यात हलवण्यास काश्मीर सरकारने जोरदार विरोध दर्शवला आहे.
मसरत आलमला काश्मीर खोऱ्यातील कुठल्याही तुरुंगात हलवण्याचे राज्यातील एकंदर सुरक्षाविषयक वातावरणात सुधारण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर गंभीर प्रकारचे विपरीत परिणाम होतील अशी रास्त भीती आहे. विशेषत: सध्याचा पर्यटनाचा मोसम आणि यानंतरची अमरनाथ यात्रा लक्षात घेता तर असे करणे धोकादायक ठरेल, असे राज्याच्या गृहखात्याने न्यायालयात सादर केलेल्या पूर्तता अहवालात म्हटले आहे.
हुर्रियतचे अध्यक्ष सैयद अली शाह गिलानी यांच्या स्वागत मिरवणुकीत पाकिस्तानी ध्वज फडकावणे आणि पाकिस्तान समर्थक घोषणा देणे या आरोपांखाली ४५ वर्षांच्या आलमला गेल्या १७ एप्रिल रोजी श्रीनगरच्या हब्बाकदल भागातील त्याच्या घरून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्याला जम्मूच्या कोट भलवाल तुरुंगात ठेवण्यात आले.
आपल्याला श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात अथवा काश्मीर खोऱ्यातील कुठल्याही जिल्हा न्यायालयात हलवण्यात यावे, अशी विनंती करण्यासाठी आलमने जम्मू उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या याचिकेवर ११ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने २ जून
रोजी राज्य सरकारला दिले होते.