News Flash

दिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या – जागतिक बँक

इतर विकसनशील देशांमधील शहरे मुंबईपेक्षा पुढेच

संग्रहित छायाचित्र

नोकरीसाठी मुंबई चांगली की दिल्ली, याबद्दल अनेकदा चर्चा होते. देशातील दोन प्रमुख महानगरांपैकी कोणते शहर उत्तम, यावर अनेकदा वादही झडतात. मात्र सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करण्यासाठी उत्तम असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. मात्र पगाराचा विचार केल्यास दिल्ली आर्थिक राजधानी मुंबईच्या पुढे आहे. दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पगार मुंबईच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.

मंगळवारी जागतिक बँकेने व्यवसाय सुलभतेबद्दलचा अहवाल जाहीर केला. यानंतर आता जगभरातील प्रमुख शहरांमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सरासरी पगाराची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. यामधून दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये इतका पगार मिळतो. तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचा अर्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त आहे.

दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार जास्त असला, तरी तेथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी सरासरी १५ भरपगारी रजा मिळतात. तर मुंबईतील कर्मचाऱ्यांना २१ भरपगारी रजा मिळतात. मात्र तरीही मुंबईत मिळणाऱ्या भरपगारी रजांची संख्या साओ पावलो (ब्राझील) आणि लंडन (ब्रिटन) येथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपगारी रजांपेक्षा कमीच आहे. साओ पावलोतील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २६, तर लंडनमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २८ भरपगारी रजा मिळतात.

मुंबईतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार इतर विकसनशील देशांमधील शहरांमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा कमीच आहे. मुंबईतील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सरासरी १३४ अमेरिकन डॉलर वेतन मिळते. याबाबतीत मेक्सिको सिटी (१५२ अमेरिकन डॉलर), व्हिएतनाम (१६८ अमेरिकन डॉलर) आणि कुवेत (१९९ अमेरिकन डॉलर) येथील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त वेतन मिळत असले, तरीही येथील राहणीमान अतिशय महागडे असल्याचे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2017 10:15 am

Web Title: workers get less salary more days off in mumbai than delhi says world bank report
Next Stories
1 ‘चहावाला पंतप्रधान होतो, अभिनेत्री मंत्री बनते, मग मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही’
2 अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये गोळीबार; दोघांचा मृत्यू
3 १६ महिन्यांत १९ वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
Just Now!
X