News Flash

नोकरी करणा-या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगचे प्रमाण ७० टक्के अधिक

पूर्वग्रहदूषित आणि भेदभावाबरोबरच काम करण्याच्या ठिकाणी असलेल्या तणावामुळे नोकरी करणा-या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.

| June 11, 2013 11:07 am

पूर्वग्रहदूषित आणि भेदभावाबरोबरच काम करण्याच्या ठिकाणी असलेल्या तणावामुळे नोकरी करणा-या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.
नोकरी करणा-या महिलांमध्ये अन्य महिलांपेक्षा स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ७० टक्के अधिक असल्याचे आढळून आल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. १९७० च्या दशकात वयाची ३० वर्षे पार केलेल्या महिलांवर अनेक दशके केलेल्या सर्वेक्षणावरून कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाचा आणि कर्करोगाच्या लागणीचा संबंध निदर्शनात आला. त्याचप्रमाणे, ज्या महिलांनी जास्त काळासाठी नोकरी केली, त्या महिलांमध्ये कर्करोग लागणाची भीती अधिक असल्याचे दिसून आले. १९७५ साली वयाच्या ३६ व्या वर्षांत असलेल्या अशा जवळजवळ चार हजार महिलांचा समावेश  या सर्वेक्षणात करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचा अहवाल ‘दि इंडिपेंडेन्ट’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणाच्या प्रमुख डॉ.  तात्याना पुद्रोवोस्का म्हणाली, ज्या महिलांनी १९७० च्या दशकात व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल ठेवले, त्यांना त्यावेळच्या समाजावर असलेल्या सांस्कृतिक पगड्यामुळे पूर्वग्रहदूषितपणाचे आणि भेदभावाचे शिकार व्हावे लागले. जुन्या रुढी-परंपरांनुसार असेच मानले जायचे की नेता म्हणून महिलांपेक्षा पुरूष अधिक सक्षम असतात. त्या म्हणाल्या, पुरूष किंवा महिला कोणत्याही महिला अधिका-याच्या हाताखाली काम करण्यास तयार नसतात. कारण महिलांची मानसिकता व्यवस्थापनाच्या पदासाठी अयोग्य मानली जाते. महिला अधिका-यांना पूर्वग्रहदूषिताचा, भेदभाव, सामाजिक विषमता त्याचप्रमाणे कर्मचारी, सहकारी आणि वरिष्ठ यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. नोकरी करणा-या महिलांना आजही अशाच प्रकारच्या ताणतणावांचा सामना करावा लागत असल्याने कर्करोगाच्या वाढीचा धोका आजही कायम असल्याचे मत डॉ. तात्याना ने मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 11:07 am

Web Title: working women 70 more likely to develop breast cancer
टॅग : Cancer 2,Woman
Next Stories
1 सेग्यू-२ आतापर्यंतची सर्वात लहान दीर्घिका
2 मध्य प्रदेश भाजप अध्यक्षांविरोधात अजित जोगी न्यायालयात
3 तुर्कस्तानमध्ये पुन्हा निदर्शने
Just Now!
X