12 July 2020

News Flash

आठ तासाला चारशे रुग्ण; डॉक्टर आणि परिचर थकले

दर आठ तासात साधारण चारशे  रुग्ण येत असून डॉक्टर व परिचर थकले आहेत.

बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गात मुकाबला करण्यात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण खूप वाढला असून अजूनही त्यांच्यावर जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी दबाव कायम आहे. याशिवाय त्यांच्याकडे सुरक्षित साधने नसल्याने त्यांनाच करोनाची लागण होण्याची शक्यता दिसत आहे. मास्क व इतर साधनांची कमतरता ही मोठी समस्या ठरत आहे.  दर आठ तासात साधारण चारशे  रुग्ण येत असून डॉक्टर व परिचर थकले आहेत.

एकतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची संख्या कमी असून वुहान येथे दर आठवडय़ाला हजारो नवीन रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. मास्क नसतानाही डॉक्टर रुग्णांना तपासत असून त्यांच्याकडे शरीराचे विषाणूपासून रक्षण करणारे कपडेही नाहीत. काहींनी डायपर बांधून स्वसरंक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वुहान येथील एका डॉक्टरने  सांगितले, की तो व त्याच्या १६ सहकाऱ्यांना आता नवीन विषाणूची लक्षणे दिसत असून फुफ्फुसात संसर्ग झाल्याने कफ होत आहे. पण सध्यातरी आमच्या जागी काम करायला दुसरे पर्यायी डॉक्टर्स व कर्मचारी नाहीत.

वुहानच्या उपमहापौरांनी सांगितले,की रोज एन ९५ मास्कची कमतरता ५६००० आहे व ४१ हजार सुरक्षित पोशाखांची गरज आहे. विलगीकरण कक्षात खास पोशाख चार तासांपेक्षा जास्त काळ घालायचा नसतो, पण डॉक्टर्स व कर्मचारी यांना सहा ते नऊ तास तो घालून काम करावे लागत आहे. सोमवारी अनेक मास्क व सूट उत्पादकांनी काम चालू केले असून चीनने ३०कोटी मास्क व ३९ लाख इतर कपडे आयात केले आहेत.

चीनच्या रेडक्रॉसला १२९ दशलक्ष डॉलर्सची मदतही मिळाली आहे. एक डॉक्टर किंवा परिचरास रोज दोन ते चार मास्क वापरण्याची वेळ आली आहे. रुग्णालयात आठ तासात ४०० रुग्ण येत असून त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी थकून जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 4:11 am

Web Title: workload on the chinese doctors increased due to coronavirus zws 70
Next Stories
1 पुदुच्चेरी विधानसभेत सीएएच्या विरोधात ठराव पारित
2 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : एका दोषीला कनिष्ठ न्यायालयाची कायदेविषयक मदत
3 जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांविरुद्ध एनआयएचे न्यायालयात पुरवणी आरोपपत्र
Just Now!
X