जगातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या पेचप्रसंगात म्हणजे करोना काळात जागतिक बँकेने साथीचा मुकाबला करण्यासाठी १५७ अब्ज डॉलर्स खर्च केले असून  त्यात आरोग्य, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर बराच खर्च झाला आहे.

केवळ पंधरा महिन्यांच्या काळात खर्च साठ टक्के वाढला असून करोना साथीच्या सुरुवातीच्या काळापासून जागतिक बँकेने १५७ अब्ज डॉलर्स  खर्च केले आहेत. या अभूतपूर्व पेचप्रसंगात जागतिक बँकेने मोठ्या प्रमाणावर खर्च केला असल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपास यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, करोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या गटाने मोठे नावीन्यपूर्ण काम केले असून विकसनशील देशांना मदत केली आहे.  जागतिक बँक करोना काळात आणखी मदत करण्यास तयार असून लशींची पुरेशी उपलब्धता नसणे ही काळजीची मोठी बाब आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली तरच लोकांचे प्राण वाचवण्यास त्याचंबरोबर त्यांची रोजीरोटी वाचवण्यास मदत होणार आहे.