भारतातील १५ कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी ७५ कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

२०२० या आर्थिक वर्षांत ( जुलै २०१९ ते जून २०२०) जागतिक बँकेने भारताला ५.१३ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते ते या दशकातील सर्वाधिक होते. त्यात कोविड १९ साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील २.७५ अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, बहुदेशीय कर्ज विकास धोरणाअंतर्गत भारताला कर्ज देण्यात आले होते आता लघु व मध्यम उद्योगांसाठीही तशीच तरतूद करण्याचा विचार आहे. सरकारला तरलता, बँकेतर आर्थिक संस्था व लहान वित्त बँका यांना पाठबळ देण्यासाठी या निधीचा वापर करता येईल त्यातून लघु व मध्यम उद्योगांना मदत होईल. त्यानंतरच्या काळात लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने संकुल पातळीवर क्षमता  वाढवण्यास मदत केली जाईल.

जागतिक बँकेच्या संचालकांनी लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी ७५ कोटी डॉलर्स मंजूर केले आहेत. कोविड १९ साथीचा भारतातील लघु उद्योगांना मोठा फ टका बसला असून ते बंद पडले आहेत त्यामुळे त्यावर विसंबून लाखो लोकांची उपजीविका गेली आहे. यापूर्वी जागतिक बँकेने प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सचे कर्ज सामाजिक व आरोग्य क्षेत्राला दिले होते.