29 September 2020

News Flash

जगावर पुन्हा वैश्विक मंदीचे ढग? ‘या’ देशांच्या अर्थव्यवस्थेने दिले संकेत

खरोखरचं आर्थिक मंदी आल्यास भारत सरकारचे पाच ट्रिलिअन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न भंगू शकते.

संग्रहीत

भारतासह आशिया आणि युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत घट होताना दिसते आहे. त्यामुळे एकरावर्षांपूर्वी आलेल्या जागतीक मंदीप्रमाणे पुन्हा मंदीचे ढग जगावर जमा झाले आहेत. याचे कारण म्हणजे, ६० टक्क्यांहून अधिक जागतीक जीडीपी हा केवळ आशियातील देशांमधून येतो.

वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातील सर्व देशांमध्ये यावेळी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा विकासदर खूपच खाली गेला आहे. त्यातच भारत आणि चीन या देशांचे सध्या अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरु आहे. यामुळे उद्य़ोंगावर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत सिंगापूरचा विकास दर केवळ ३.४ टक्के होता, जो २०१२ नंतर सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला. तर दुसरीकडे चीनच्या आयातीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत १.३ टक्के घट झाली आहे. निर्यातीच्या आकडेवारीतही ७.३ टक्क्यांची घट झाली आहे. तर दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत देखील या वर्षाच्या पहिल्या तिमाहित मोठी घट झाली होती. त्यानंतर याता चीन सोमवारी आपल्या जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करणार आहे. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, मागणी नसल्याने जगातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनही ठप्प झाले आहे. या कंपन्यांकडे जुना स्टॉकच इतका शिल्लक आहे की, त्याला बाजारातील मागणीनुसार बाहेर काढण्यातही अधिक वेळ लागत आहे. त्याचबरोबर चीन आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात वाईट परिस्थिती असल्याचे चित्र आहे. भारतात सलग तिसऱ्या महिन्यांत गाड्यांच्या विक्रीत घट होताना दिसत आहे असेच चित्र चीनमध्येही आहे. जूनच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये वाहनांच्या विक्रीत ९.६ टक्के घसरण झाली आहे. चीनमध्ये गेल्या १२ महिन्यांत गाड्यांच्या वक्रीत सातत्याने घट नोंद केली जात आहे.
एकूणच जागतीक जीडीपीमध्ये घसरण झाली असून अमेरिकेतील मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टेनलीने मंदीची परिस्थिती लक्षात घेत जागतीक जीडीपीमध्ये २० बेसिस पॉईंटने घट केली आहे. या बँकेने २०१९ साठी ३ टक्के तर २०२० साठी ३.२ टक्के इतक्या जीडीपीच्या दराचे भाकीत केले आहे.

मंदी आल्यास भारतावर होणार गंभीर परिणाम

मंदी आल्यास त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण, असे झाल्यास मोदी सरकारचे पाच ट्रिलिअन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न भंगू शकते. सरकारने या वर्षाच्या बजेटमध्ये याची घोषणा देखील केली आहे.

२००८ मध्ये आली होती मंदी

यापूर्वी अकरावर्षांपूर्वी २००८ मध्ये आलेल्या मंदीच्यावेळी देखील कंपन्यांचे उत्पादन बंद पडले होते तसेच बेरोजगारीचा आकडा देखील वाढला होता. लेमेन ब्रदर्स आणि बँक ऑफ अमेरिका दिवाळखोरीत निघाल्यानंतर सुरु झालेल्या मंदीचे ढग संपूर्ण जगावर पसरले होते. त्यानंतर जगाला या मंदीतून बाहेर पडण्यासाठी तीन वर्षे जावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 5:19 pm

Web Title: world has faced a global recession clouds again these countries economy given signals aau 85
Next Stories
1 … तर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल : बिपिन रावत
2 कर्नाटक: आणखी पाच आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव, अविश्वास प्रस्तावासाठी येडियुरप्पा तयार
3 पोलिसही मॉब लिंचिंगचे बळी; मायावतींचा आरोप
Just Now!
X