इजिप्तमधील राजकीय उलथापालथीवर जगभरातील नेत्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र सर्वाच्याच प्रतिक्रियांमधून या देशात लोकशाहीची लवकरांत लवकर स्थापना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे.
– सध्याची स्थिती अतिशय भीतीदायक असून इजिप्तमधील सर्वच पक्षांनी हिंसेचा मार्ग टाळावा. – ब्रिटनचे परराष्ट्र सचिव विलियम हेग

– इजिप्तमधील अराजकसदृश स्थिती आणि तेथील अनिश्चितता लक्षांत घेता येथे शांततामय, अहिंसात्मक आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा निघावा. तसेच हा तोडगा काढताना सर्वसमावेशकतेचा विचार केला जावा. – बॅन की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र संघ

– इजिप्तमध्ये शक्य तितक्या तातडीने लोकशाहीची स्थापना करण्यात यावी. पारदर्शक आणि मुक्त वातावरणांत केंद्रीय निवडणूका घेतल्या जाव्यात. तसेच देशात राज्यघटनेची सन्मानाने अंमलबजावणी करण्यात यावी. या असंतोषाच्या आविष्कारानंतर देशातील संक्रमणावस्था संपून तेथे पूर्णाशाने लोकशाही स्थापित व्हावी. – कॅथरीन अ‍ॅश्टन, युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख

– अत्यंत संक्रामक अवस्थेनंतर इजिप्तमध्ये अंतिमत निवडणूका जाहीर झाल्या हे आमच्या दृष्टीने समाधानकारक आहे. – लॉरँ फॅबिये, परराष्ट्र व्यवहार मंत्री, फ्रान्स

– इजिप्तमधईल नव्या नेतृत्वाचे अभिनंदन. इतिहासाच्या या टप्प्यावर लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात इजिप्तला य येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना! – राजे अब्दुल्ला, सौदी अरेबिया