पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटवरून निषेध व्यक्त केला आहे. ‘पॅरिसमधील हल्ला हे नीच आणि निंदनीय कृत्य आहे. अशा संकटाच्या समयी आम्ही फ्रान्सच्या नागरिकांच्या पाठीशी आहोत,  या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी संवेदना व्यक्त केली.


हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, की फ्रान्सच्या नागरिकांवर नाही तर मानवतेवर हल्ला आहे. हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्धरित्या करण्यात आला. आम्ही फ्रान्ससोबत आहोत.

पॅरिसमधील सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १५३ नागरिकांचा मृत्यू व २०० हून अधिक जखमी झाले आहेत.