25 January 2021

News Flash

पुढच्या महामारीसाठी जगानं चांगल्या तयारीनं सज्ज असायला हवं; WHO चा सल्ला

टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी केलं आवाहन

संग्रहित छायाचित्र

करोना महामारीनं संपूर्ण जग हैराण झालं आहे. करोना विषाणूनं जगाचं चित्र बदलून टाकलं असून, भारतासह अनेक देश या महामारीचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची मृतांची संख्या वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं आणखी एक इशारा वजा सल्ला दिला आहे. जगानं अधिक तयारीनं पुढील महामारीसाठी सज्ज असलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.

भारतासह जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अनेक देश करोनाविरुद्धची लढाई लढत असून, चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आतापर्यंत जगातील २७.१९ मिलियन लोकांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे. तर ८ लाख ८८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही. त्यातून जग अजून बाहेर पडलेलं नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं पुढील काळात येणाऱ्या महामारीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

जगातील करोना परिस्थितीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहनं केलं. जिनिव्हा येथे बोलताना टेड्रॉस म्हणाले, “ही अखेरची महामारी नाही. इतिहास आपल्याला शिकवतो की, महामारी आणि उद्रेक या गोष्टी जीवनातील वास्तव आहे. परंतु जेव्हा पुढची महामारी येते, तेव्हा जगानं त्याचा सामना करण्यासाठी आता आहे त्यापेक्षा अधिक सज्ज असायला हवं,” असं ते म्हणाले.

सध्या इतर देशांच्या तुलनेत भारतात दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून येण्याचा विक्रमही दुर्दैवानं भारताच्या नावे नोंदवला गेला आहे. करोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत सध्या अमेरिका पहिल्या क्रमाकांवर आहे. तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. दोन दिवसांपूर्वीच ब्राझीलला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 3:39 pm

Web Title: world must be better prepared for next pandemic says who chief bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 नोएडा : टॅक्सीचालकाची हत्या, आरोपींनी ‘जय श्रीराम’चे नारे देण्यासाठी भाग पाडल्याचा मुलाचा दावा
2 भारताला आणखीन एक झटका?, २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेत १०.५ टक्क्यांनी घट होणार; ‘फिच’चा अंदाज
3 संजय राऊतांच्या नॉटी, हरामखोर शब्दांवरून पेटलेला वाद आहे तरी काय?
Just Now!
X