26 September 2020

News Flash

#WorldPopulationDay: जागतिक लोकसंख्येबद्दल या १२ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

जगतिक लोकसंख्या वाढीतील ३० टक्के लोकसंख्या वाढ ही अपघातातून झालेली (Accidental) गर्भधारणा किंवा नकोश्या (Unwanted) गर्भधारणेतून होते.

जागतिक लोकसंख्या दिन (प्रातिनिधिक फोटो)

आज आहे जागतिक लोकसंख्या दिन. जगभरामध्ये आज ७४० कोटी लोक राहतात. याच इतक्या मोठ्या लोकसंख्येबद्दलची काही खास आकडेवारी आज आपण पाहणार आहोत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त…

>
इसवी सन १००० साली जगाची लोकसंख्या केवळ ४० कोटी इतकी होती. १८०४ साली जगाची लोकसंख्या १०० कोटी झाली. म्हणजेच जागतिक लोकसंख्या ६० कोटींने वाढण्यासाठी चक्क ८०४ वर्षांचा कालावधी लागला. मात्र त्यानंतर लोकसंख्येचा स्फोट झालाय की काय अशी शंका यावी इतक्या झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली.

>
१९६० साली जगाची लोकसंख्या ३०० कोटी इतकी झाली. म्हणजेच अवघ्या १५६ वर्षांमध्ये जागतिक लोकसंख्या १०० कोटींवरून ३०० कोटी झाली.

>
आजच्या तारखेला ७४० कोटी लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या १३२ कोटी ७० लाख आहे. म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के लोकं भरतात राहतात

>
२०२० पर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण लोकांचा देश असेल. आणखीन दोन वर्षांनी भारतातील ६४ टक्के लोकसंख्या ही कार्यक्षम (वर्किंग पॉप्युलेशन) असेल.

>
जगभरात दिसून येणारा लोकसंख्येबद्दलचा विस्थापित होण्याचा ट्रेण्ड भरतातही दिसून येतो. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी ५० ट्क्के म्हणजेच ३९० कोटी लोक शहरांमध्ये विस्थापित झाले आहेत.

>
२०११च्या जनगणनेनुसार भारतातील ३२.४ टक्के लोकसंख्या ही शहरी लोकसंख्या आहे.

>
जगभरात रोज ८०० महिला गर्भधारणेसंदर्भातील आजार आणि प्रसूती दरम्यान मरण पावतात. यापैकी २० टक्के महिला भारतातील आहेत. म्हणजेच भारतात रोज १६० महिला गर्भधारणेसंदर्भातील आजार आणि प्रसूती दरम्यान मरण पावतात.

>
जगतिक लोकसंख्या वाढीतील ३० टक्के लोकसंख्या वाढ ही अपघातातून झालेली (Accidental) गर्भधारणा किंवा नकोश्या (Unwanted) गर्भधारणेतून होते.

>
भारतामधील ४७ टक्के मुलींचा बालविवाह होतो. वयाच्या १८व्या वर्षाआधीच या मुलींची लग्न लावून दिली जातात. जर जागतिक स्तरावर बालविवाहाचे हे प्रमाण ४६ टक्के इतके आहे.

>
भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी ४१ टक्के लोक हे २० किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील आहे. म्हणजे भारताची ४१ टक्के लोकसंख्या ही २० वर्षाहून कमी वयाची आहे. जगभरात हेच सरासरी वय हे २४ इतके आहे.

>
जगातील एकूण भूखंडापैकी २.४ टक्के भूखंडावर परसलेल्या भारतामध्ये जागतिक लोकसंख्येच्या १७.३१ टक्के लोक राहतात. म्हणूनच भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे.

>
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार हे शतक संपेपर्यंत म्हणजेच २१०० पर्यंत जागतिक लोकसंख्येचा फुगवाटा झाला तर ती १७०० कोटी इतकी असेल. किंवा नैसर्गिक आपत्ती, रोगराई, आरोग्य सेवांची कमतरता यासारख्या गोष्टींमुळे ती कमी होऊन ७०० कोटी इतकीच राहिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:10 pm

Web Title: world population day did you know these 12 facts about global population
Next Stories
1 अमेरिकेचे ऐकाल तर परिणाम भोगावे लागतील, इराणचा भारताला इशारा
2 सुप्रीम कोर्टाच्या सद्सदविवेकबुद्धीवर केंद्राने सोडला समलैंगिकतेचा फैसला
3 धक्कादायक ! शाळेची फी भरली नाही चिमुकल्या विद्यार्थिनींना ठेवलं कोंडून
Just Now!
X