आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यांमध्ये प्रथमच महिला पंच मैदानात पहायला मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) विश्वचषक स्पर्धेसाठी पंच म्हणून जाहीर केलेल्या ३१ जणांच्या चमूमध्ये न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेर पोलोसाक या दोन महिला पंचांचा समावेश आहे. या दोघीही ८ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावतील. यापैकी कॅथलिन १६ मार्च रोजी चेन्नईत होणाऱ्या पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील सामन्यात पंच असतील. यानंतर दोन दिवसांनी मोहालीत होणाऱ्या न्यूझीलंड वि. आयर्लंड या सामन्यात क्लेर भारताच्या विनित कुलकर्णींबरोबर पंच म्हणून काम पाहतील.
पुरूषांच्या क्रिकेट सामन्यात महिलांनी पंचगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नाचजेल लाँग व मराईस इरॅस्मस यांनी मुख्य पंचांची भूमिका बजावली होती.