26 February 2021

News Flash

जर्मनी : दुसऱ्या महायुद्धातील 500 किलोचा जिवंत बॉम्ब सापडला

हा बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्बनाशक पथकाला एक तासाहून अधिक वेळ लागला, सुरक्षिततेसाठी परिसरातील 18 हजार 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.

दुसऱ्या महायुद्धाला जवळपास 70 वर्ष उलटून अद्यापही जर्मनीत त्या युद्धातील जिवंत बॉम्ब सापडत आहेत. जर्मनीच्या फँकफ्रंट येथे रविवारी बॉम्बनाशक पथकाने दुसऱ्या महायुद्धातील 500 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब निकामी केला. हा बॉम्ब आढळल्यानंतर येथे काही वेळाकरता खळबळ उडाली होती. बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी सुरक्षिततेसाठी परिसरातील जवळपास साडेअठरा हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

हा बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्बनाशक पथकाला एक तासाहून अधिक वेळ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकी सैन्याकडून हा बॉम्ब टाकण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बॉम्ब आढळल्यानंतर परिसरातील 1 हजार मिटर पर्यंत राहणाऱ्या सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. परिसर खाली केल्यानंतर बॉम्ब निकामी करण्याची मोहीम बॉम्बनाशक पथकाने हाती घेतली आणि तासाभरापेक्षा जास्त वेळानंतर हा बॉम्ब निकामी केला. त्यानंतर पथकाने अधिकृत ट्विटर अंकाऊंटवरून या बॉम्बचा फोटो ट्विट केला आणि बॉम्ब निकामी केल्याची ‘गुड न्यूज’ नागिरकांना दिली.


यापूर्वी, गेल्या वर्षीही जर्मनीतच तब्बल 1.8 टन वजनाचा ब्रिटीश लष्कराचा जिवंत बॉम्ब सापडला होता. त्यावेळीही परिसरातील 60 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवून बॉम्ब निकामी करण्यात आला होता. तर, याच वर्षी एप्रिल महिन्यात फ्रान्सच्या नॉरमेडी भागात 220 किलोचा बॉम्ब आढळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 11:08 am

Web Title: world war ii bomb found and defused in germany after 18500 evacuated
Next Stories
1 सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटवर मालदीव संतप्त, भारतीय उच्चायुक्तास समन्स
2 Kerala Flood: नासाने प्रकाशित केलेले पुरानंतरचे ‘हे’ फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल
3 वॉरेन बफेट यांची भारतात ‘एन्ट्री’, पेटीएमचं नशीब फळफळलं
Just Now!
X