01-china-trainविश्वातील पहिली रूळ (ट्रॅक) विरहित ट्रेन चीनने जगासमोर आणली आहे. ही ट्रेन ‘व्हर्च्युअल ट्रॅक’वर चालते. रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण न करता रस्त्यावरून धावणाऱ्या भल्यामोठ्या बसची चाचणीदेखील चीनमध्ये सुरू आहे. नवीन ट्रेन ही चीनच्या ‘इंटेलिजन्ट रेल एक्स्प्रेस सिस्टीम’चा भाग आहे. ‘रेल्वे ट्रॅक’ऐवजी ही ट्रेन ‘रबर टायर्स’वर धावते. या ट्रेनचा कमाल वेग ताशी ७० किमी इतका आहे. जाणून घेऊया या अनोख्या ट्रेनची वैशिष्ट्ये. (छाया – सीआरआरसी)

02-china-train३० मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये सध्या तीन डब्बे देण्यात आले आहेत. यातून ३०० प्रवासी प्रवास करू शकतात. भविष्यात अधिक डब्बे वाढविण्यात येतील आणि ५०० प्रवासी प्रवास करू शकतील. (छाया – सीआरआरसी)

03-china-trainयात बसविण्यात आलेल्या सेंसरमुळे ट्रेनला रस्त्याचे आकारमान समजण्यास मदत होते. ज्याच्या मदतीने ट्रेन स्वत: तिचा मार्ग निश्चित करते. (व्हिडिओ ग्रॅब न्यू चायना टीव्ही)

04-china-trainया पर्यावरणस्नेही ट्रेनला इलेक्ट्रिक ऊर्जादेखील पुरविण्यात आली आहे. पूर्णपणे चार्ज झाल्यावर ही ट्रेन ४० किमीचा पल्ला पार करते. (छाया – सीआरआरसी)

05-china-trainचीनच्या ‘सीआरआरसी झुझॉऊ इन्स्टिट्यूट’ने ‘दी अॅटोनोमस रेल रॅपिड ट्रान्झिट’ (एआरटी) तंत्रज्ञान विकसित केलं आहे. (छाया – सीआरआरसी)
06-china-trainझुझॉऊ शहरात या ट्रेनसाठी ६.५ किलोमीटरची ‘एआरटी’ लाईन टाकण्याची चीनची योजना असून, २०१८मध्ये ट्रेन कार्यान्वयीत होईल. (व्हिडिओ ग्रॅब न्यू चायना टीव्ही)