करोनामुळे जगभरात आतापर्यंत ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून १९२ देशांमधील १५ लाख १९ हजार २६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख १२ हजार १०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. युरोपमध्ये सात लाख ८७ हजार ७४४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ६२ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ३९ हजार ४२२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर स्पेनमध्ये एक लाख ५२ हजार ४४६ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १५ हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे चार लाख ३२ हजार १३२ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये एक लाख १२ हजार ९५० जणांना लागण झाली असून आतापर्यंत १० हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये ६० हजार ७३३ जणांना लागण झाली असून आतापर्यंत सात हजार ०९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये हाँगकाँग आणि मकाऊ वगळता तीन हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८१ हजार ८६५ जणांना लागण झाली आहे, तर ७७ हजार २७९ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.