शुक्रवारी रात्री व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत होत्या. काही यूजर्सना व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती.

डाउनटाइम रिपोर्टिंग सर्व्हिस “डाउनडेटेक्टर”च्या म्हणण्यानुसार शुक्रवारी रात्री १०.४० वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. १ तासापेक्षा अधिक काळ व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मेसेज पाठवण्यास किंवा मिळण्यास अडचण येत होती. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार ४९ मिनीटेच हा प्रकार सुरू होता.

दरम्यान, कंपनीने या प्रकाराबाबत नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅपशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात सुद्धा अनेकांना अडचण येत होती. मात्र एका तासानंतर या सर्व सेवा पूर्वरत झाल्या आहेत.