News Flash

लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक; तेजस्वी घेणार नितीश कुमार यांची भेट

दिल्लीला हलवण्याची तयारी

संग्रहित छायाचित्र

रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याची शक्यता असून, तेजस्वी यादव उद्या भेट घेणार आहेत.

तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानं शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी लालूंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. तब्बल पाच तास सर्वजण लालूंसोबत होते.

लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. “त्यांच्यावर (लालू प्रसाद यादव) चांगल्या ठिकाणी उपचार करण्याची आमची इच्छा आहे. पण, जोपर्यंत सर्व चाचण्याचे अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट येण्याची वाट बघत आहोत. त्यांची शुगर वाढली असून, किडनी व्यवस्थित कार्यरत नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी झालं आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे,” अशी माहिती तेजस्वी यांनी दिली.

लालू प्रसाद यादव यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर रांचीतच उपचार करायचे की, दुसऱ्या ठिकाणी हलवायचं हे ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, लालू यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात तेजस्वी यादव उद्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहे. तेजस्वी यांनी भेटीबद्दलची माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:50 pm

Web Title: worries over lalu prasads health grow tejashwi yadav to meet cm today bmh 90
Next Stories
1 चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; आंदोलनस्थळी आरोपीला पकडलं
2 नवसंजीवनी! हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार; म्हणाले,…
3 अमेरिकेत परदेशी प्रवाशांना करोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक
Just Now!
X