प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानाने जातीचे दोरखंड उखडून टाकण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. मंदिरामध्ये ब्राह्मणेतर मंडळींना पूजा-अर्चेचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखत दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या जवळपास २०० लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी चित्तूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ांतील दलितांची निवड करण्यात येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला देवस्थानाने पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आखली असून या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.