30 September 2020

News Flash

‘…तर पुढील आठवड्यातच चीनवर अणुबॉम्ब टाकू!’

काही दिवसांपूर्वीच चीननंही या देशाला धमकी दिली होती

संग्रहित छायाचित्र

चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी अमेरिकेच्या कमांडरनं दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिले तर पुढील आठवड्यातच चीनवर अणुबॉम्ब टाकू, असं यूएस पॅसिफिक फ्लीट कमांडरनं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाई नॅशनल युनिव्हर्सिटी सुरक्षा संमेलनात त्यांनी ही धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच चीननं अमेरिकेला धमकी दिली होती. त्यानंतर आता अमेरिकेच्या कमांडरनं अणुबॉम्ब हल्ला करण्याचा इशारा दिल्यानं या दोन्ही देशांतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सागरी किनाऱ्यावर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सैन्याचा युद्ध सराव झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाई नॅशनल युनिव्हर्सिटी सुरक्षा संमेलनात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपस्थितांनी अमेरिकी कमांडर अॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांना चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिले तर पुढील आठवड्यातच चीनवर अणुबॉम्ब हल्ला करू, असं स्विफ्ट यांनी सागितलं.

अमेरिकी लष्करातील प्रत्येक सैन्याला संविधानाचं देशातील तसेच विदेशातील शत्रूंपासून रक्षण करण्याची शपथ दिली जाते. तसेच अधिकारी आणि देशाच्या अध्यक्षांच्या आदेशांचे पालन करण्यासंबंधी सांगितलं जातं. अमेरिकी संविधानाचं तेच मूलभूत तत्त्व आहे, असेही स्विफ्ट यांनी सांगितलं. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी दक्षिण आणि पूर्व सागरी क्षेत्रात चीन आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. त्यानंतर चीननं अमेरिकेला धमकीही दिली होती. त्यानंतर आता अमेरिकी कमांडरनं चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्यानं चीन-अमेरिका यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 3:52 pm

Web Title: would launch nuclear strike against china if president donald trump ordered us commander
टॅग China
Next Stories
1 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
2 नितीश कुमार हे खूप मोठे संधीसाधू; लालूंची घणाघाती टीका
3 नितीशकुमारांच्या राजकीय भूकंपानंतर जदयूला तडा, शरद यादव, अन्वर अली नाराज
Just Now!
X