News Flash

इंदिरा गांधींची महती सांगायला मला नवा जन्म घ्यावा लागेल- सोनिया गांधी

काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Congress President Sonia Gandhi : इंदिरा गांधी या भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. १९ नोव्हेंबर १९९७ रोजी जन्म झालेल्या इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७७ आणि त्यानंतर १९८० ते १९८४ या काळात भारताचे पंतप्रधानपद भुषविले होते.

इंदिरा गांधी यांची महती सांगायला मला नवा जन्म घ्यावा लागेल, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. इंदिरा गांधी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. इंदिरा गांधी यांची महती सांगायची झाली तर मला आणखी दोनदा जन्म घ्यावा लागेल, असे सोनियांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इंदिरा यांना श्रद्धांजली वाहिली. इंदिरा गांधी या भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. १९ नोव्हेंबर १९१७ रोजी जन्म झालेल्या इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७७ आणि त्यानंतर १९८० ते १९८४ या काळात भारताचे पंतप्रधानपद भुषविले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:29 pm

Web Title: would need rebirths to tell indiras story congress president sonia gandhi
Next Stories
1 नोटाबंदीचा फटका विकासदराला; भारत चीनच्या मागे पडण्याची भीती
2 नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यूंमुळे मोदींना शाप लागेल: शंकराचार्य
3 हिंदू शब्दाचा उच्चार करण्यासही काहींना भीती वाटते- व्यंकय्या नायडू
Just Now!
X