वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे काही अवशेष मंगळवारी शोध पथकास आढळुन आले आहेत. शोध मोहिमेदरम्यान अरूणाचल प्रदेशातील लिपोच्या उत्तरीय भागात विमानाचे काही भाग दिसले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. हे विमान ३ जून रोजी जोराहाट येथून निघाले होते व त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यामध्ये आठ क्रू मेंबरसह १३ प्रवासी होते.
Indian Air Force: Efforts are now continuing to establish the status of occupants & establish survivors. Further details will be communicated as the recovery actions progress https://t.co/Fx6cmabJvi
— ANI (@ANI) June 11, 2019
वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले, शोध मोहिम अजुनही सुरू आहे मात्र बेपत्ता विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही.
खराब हवामान असूनही भारतीय वायुसेनेकडून या विमानाची शोधमोहिम युद्धपातळीवर राबली जात आहे. हे विमान अरूणाचल प्रदेशकडे जाण्याच्या मार्गावरच बेपत्ता झाले. मागिल आठवड्यात बुधवारी वायुसेनेने या विमानाच्या शोधासाठी एसयू – ३० जेट लढाऊ विमान, सी १३०जे, एमआय१७, व एएलएच हॅलिकॅाप्टर पाठवलेले आहे.ही शोधमोहिमा आसामच्या जोरहाट ते अरूणाचल प्रदेशच्या मेचुका अॅडव्हान्स्ड लॅण्डिंग ग्राउंडदरम्यान असलेल्या वन क्षेत्रात केली जात आहे. याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे उपग्रह काटरेसॅट व आरआयसॅट यांच्याद्वारे देखील या भागांची छायाचित्र काढण्यात आली आहेत.
IAF Sources: Wreckage of the missing AN-32 aircraft has been found by Mi-17 helicopters of the Indian Air Force pic.twitter.com/ZcBcy5vXvI
— ANI (@ANI) June 11, 2019
वायुसेनेचे माजी हवाई अधिकारी कमांडिंग चीफ एअर मार्शल आर.डी.माथुर या शोध व बचाव मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय इंडो-तिबेट सीमा पोलीस, अरूणाजल पोलीस व स्थानिकांकडूनही शोध घेतला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 3:46 pm