सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन
सीएएविरोधातील निदर्शनांमध्ये दहशतवादी घुसण्याबाबत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर विजयन यांनी शुक्रवारी मोदींवर हल्ला चढविला. मोदी यांनी दिलेला संदर्भ सपशेल खोटा आणि निषेधार्ह असल्याचे विजयन यांनी म्हटले आहे.
सीएएबाबत विरोधक देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. विजयन एकीकडे सीएएविरोधातील आंदोलनात दहशतवादी घुसतील, असा इशारा देतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष दिल्लीत सीएएविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देतो, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी केलेल्या भाष्याला विजयन यांनी हरकत घेतली असून मोदींनी निवेदन सुधारावे, अशी मागणी केली आहे. केरळबाबत मोदी यांनी राज्यसभेत केलेले निवेदन सपशेल खोटे आणि निषेधार्ह आहे, असे विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. जनतेच्या चळवळीत जे घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही इशारा दिला, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 1:19 am